शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:00 IST

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातलं काम अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री केली. त्यानंतर आज मोदी सरकारनं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणनेचा पहिल्या टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अपडेट करण्याचं काम पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे. 

कोरोनाच्या संकटाची तीव्रता दिवसागणिक वाढतच असल्यानं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच एनपीआर अपडेट करण्याची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये एनपीआरची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू केली जाणार होती. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत एनपीआर अपडेट करण्याची प्रक्रिया स्थगित केली जात असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली आहे.  २०२१ मध्ये होणारी जनगणना दोन टप्प्यांत केली जाणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. या अंतर्गत एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान जनगणना प्रक्रियेत सहभागी झालेले कर्मचारी घरोघरी जाऊन मोजणीचं काम करणार होते. एनपीआर अपडेट करण्याचं काम पहिल्याचं टप्प्यात केलं जाणार होतं. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता सध्या ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी