लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान दिल्लीच्या रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने तब्बल ९९.६ टक्के (५०० पैकी ४९८) गुण मिळवून पटकाविला आहे.चंदीगडची भूमी सावंत-डे या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९७ गुण मिळवून दुसरे स्थान मिळविले आणि ५०० पैकी ४९६ एवढे समान गुण मिळालेल्या आदित्य जैन व मन्नत लुथ्रा या दोघांनी देशात तिसरे स्थान पटकावले आहे.परीक्षा दिलेल्या देशातील एकूण १० लाख २० हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ३७ हजार २२९ म्हणजेच ८२.२ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या ८३.०५ टक्यांहून यंदाचे उत्तीर्णतेचे प्रमाण कमी आहे. मात्र यंदा १०हजार ९१ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक तर ६३ हजार २४० विद्यार्थ्यांनी ९० टक्कयांहून अधिक गुण मिळविले.परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत विशेष हेल्पलाइन चालविली. त्यावर फोन करणाऱ्यांचे मनोवैज्ञानिक समुपदेशन करण्यासाठी ६५ समुपदेशक नेमण्यात आले होते.
सीबीएसई १२ वीत दिल्लीची रक्षा पहिली
By admin | Updated: May 29, 2017 08:52 IST