शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हल्लीच्या काळातील पहिलीच कारवाई; भाजपने आमदार बसनगौडा पाटलांची केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:43 IST

Basangowda Patil Yatnal News: भाजपाचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. सोन्याची तस्करी करणारी रान्या राव हिच्यावर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

देशभरात एवढे वाचाळवीर राजकारणी झाले आहेत की रोज उठून वाट्टेल ते बरळले जात आहे. महिलांविरोधात, एखाद्या थोर पुरुषाविरोधात, धर्मांविरोधात हे वाचळवीर राजकारणी बोलत असतात. त्यांना त्यांचे त्यांचे पक्ष पाठीशी घालत असतात. काँग्रेस, सपाच नाही तर भाजपातही अशा वाचाळवीरांची मोठी संख्या आहे. परंतू, यांच्यावर कारवाई काही केल्या होत नाही. परंतू, भाजपाने हल्लीच्या काळातील पहिलीच कारवाई केली आहे. 

भाजपाचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. सोन्याची तस्करी करणारी रान्या राव हिच्यावर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यतनाळ यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यावर त्यांचे उत्तर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यतनाळ हे विजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बसनगौडा पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. पक्षाच्या कारवाईवर बसनगौडा पाटील यत्नाळ यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. परंतू याच पाटलांनी  डिसेंबर २०२३ मध्ये भाजपला धमकी दिली होती. मला पक्षातून काढून टाकले तर मी कोरोनामधील घोटाळे उघड करेन, असे त्यांनी म्हटले होते.   

बसनगौडा पाटील अभिनेत्री राववर वक्तव्य करताना तिने सोने तिच्या गुप्तांगात लपवले होते, असे म्हटले होते. यासाठी त्यांनी अश्लिल शब्द वापरला होता. आता भाजपाने कारवाई केली आहे. तुम्ही तुमचे वर्तन सुधारण्याचे आश्वासन दिले होते पण ते झाले नाही. तुम्ही वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले आहे, म्हणून तुम्हाला पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे भाजपाने कळविले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटक