पाकिस्तानचा सीमेवरील चौक्यांवर गोळीबार
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्यांना सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानचा सीमेवरील चौक्यांवर गोळीबार
जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्यांना सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले.एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अरनिया आणि आर.एस.पुरा उपसेक्टरमधील नागरी वसाहती आणि चौक्यांना लक्ष्य बनविण्यात आले. सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी लगेच प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला. पहाटे २.३० वाजेपर्यत ही चकमक सुरू होती. या भागातून लोकांनी स्थलांतरण केले नसून स्थितीवर आमची बारीक नजर आहे. गरज पडल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. जोरा फार्म,जगनूचक, खोडा, पिंडी, पित्तळ, चिनाज, विक्रमन, साई, निकोवाल आणि जबोवाल गावावर झालेल्या या तुफान गोळीबारात तीन जण जखमी झाले. गेल्या एक आठवड्यात पाकिस्तानकडून सहावेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. दहशतवादी घुसखोरीच्या तयारीतसीमेपलीकडे दडून बसलेले दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. परंतु सीमा सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.बीएसएफचे काश्मीर फ्रंटियरचे महानिरीक्षक पी.एस. संधू यांनी श्रीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न थांबणार नाहीत. ते संधीच्या शोधात आहेत. परंतु आमचे जवान त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत. मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेलगतच्या क्षेत्रात तळ ठोकून असून प्रशिक्षण शिबिरांमधील त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. (वृत्तसंस्था)