ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २० - उत्तर प्रदेशची राजधानी असणा-या लखनऊ शहरातील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा जण ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी मोहनलालगंज भागातील कारखान्यात भीषण स्फोट झाला व धुराचे लोट पसरले. या स्फोटात कारखान्यातील मजुरांपैकी सहा जण मृत्युमखी पडले आहेत तर १४ जण जखमी झाले. पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवानघटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. फटाक्यांचा हा कारखाना अवैधरित्या चालविण्यात येत होता, असे समजते.
दरम्यान या स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.