शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

गाझियाबादमध्ये ५ हजार जणांवर गुन्हे दाखल, ३२ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:22 IST

दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.

गाझियाबाद - दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.आतापर्यंत २८५ जणांवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. शहरी भागातील ४३ तसेच ग्रामीण भागातील १७ ठिकाणे अतिसंवेदशील असून तिथे पुन्हा हिंसक निदर्शने होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतबंदच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांत जखमी झालेल्या नऊ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)गांधीजींच्या पुतळ््याची विटंबनाराजस्थानमधील नाथद्वारा येथे महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ््याची विटंबना करण्यात आल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आले. या अर्धपुतळ््याचे शिर अज्ञात दंगेखोरांनी तोडले आहे. य्याआधी ८ मार्चला केरळमधील तलीपरम्बा येथे गांधीजींच्या पुतळ््याची विटंबना करण्यात आली होती. देशामध्ये गेल्या काही महिन्यापासून महापुरुषांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडत आहेत. तामिळनाडूमध्ये द्रविडी नेते पेरियर, पश्चिम बंगालमध्ये जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, मावना येथे डॉ. आंबेडकर, त्रिपुरामध्ये व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडले आहेत.संचारबंदी कायम- मध्य प्रदेशमध्ये भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसक निदर्शने झालेल्या ग्वाल्हेर, भिंड, मुरेना जिल्ह्यातील काही भागांमध्ये लागू केलेली संचारबंदी यापुढेही कायम राहाणार आहे.- रोज सकाळी १० ते दुपारी १२च्या दरम्यान संचारबंदी शिथिल करण्यात येईल.- मुरेना येथे मंगळवारी पोलिसांवर दगडफेक करणा-या ५० निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक मृतदेह मिळाल्याने राज्यात बंदच्या दिवशी ठार झालेल्यांची संख्या सात झाली आहे.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBharat Bandhभारत बंदUttar Pradeshउत्तर प्रदेश