शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तोडगा काढा, अन्यथा मोठा फटका; व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:57 IST

गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली.

नवी दिल्ली : दिल्लीकडे येणाऱ्या मालवाहतुकीपैकी जवळपास ४० टक्के वाहतूक शेतकरी आंदोलनामुळे प्रभावित झाली आहे. दिल्ली आणि एनसीआर व्यापारावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडला असून, गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली.शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी त्यामुळे केंद्र सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढावा, तसेच सरकारने खुल्या मनाने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे. आंदोलन पुढेही असेच सुरू राहिले तर, व्यापारी, मालवाहतूकदार तसेच इतर वर्गांना व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागेल. कोरोनामुळे आधीच व्यापार प्रभावित झाला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दिवाळीनंतर व्यापार हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती; परंतु शेतकरी आंदोलनामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकरी आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम)कडून करण्यात आला आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणालाही फटका आंदोलनामुळे पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे दररोज ३,५०० कोटींचे नुकसान होत आहे. आंदोलनामुळे या राज्यातील परस्पर जोडल्या गेलेल्या अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसला आहे. या राज्यांतील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत.