शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

अखेर कळवण , दिंडोरी, पेठ, निफाडला परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी कारभारी लाभले

By admin | Updated: August 22, 2016 23:48 IST

....

....कळवण -जिल्ह्यात सात नगरपंचायती स्थापन होऊन तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला ,तरी नगरपंचायतींना मुख्याधिकार्?यांची प्रतिक्षा लागून होती. मुख्याधिकार्?यांअभावी शहरातील विकासकामे ठप्प झाल्याने , विकासप्रक्रि याच मंदावली होती. अन्य मुख्याधिकारी किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे प्रभारी मुख्याधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता.परिणामी नागरिकांच्या रोषाला नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना सामोरे जावे लागत होते . अनेकवेळा मुख्याधिकार्?यांसाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाने मात्रकानाडोळा केल्याने नगरपंचायतीच्या पदाधिकार्?यांवर पूर्वीची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली असतांना कळवण , दिंडोरी, पेठ, निफाडला अखेर परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांची नियुक्ती करु न तात्पुरते कारभारी लाभले आहे.शासनाने 13 ऑगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारावर शिफारस केलेल्या परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून 2 मे 2016 पासून 2 वर्षासाठी नियुक्ती केली असून राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीवर मुख्याधिकारी नसल्याने परिविक्षाधीन कार्यक्र मानुसार मुख्याधिकारी यांना प्रशिक्षण न देता त्यांना मुख्याधिकारी पदावर नियुक्ती देऊन हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कळवण येथे डॉ सचिनकुमार पटेल , निफाड येथे किशोर चव्हाण, दिंडोरी येथे अनंत जवादकर तर पेठ येथे रवीद्र लाडे यांची शासनाने मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील निवडक नगरपंचायत व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष अनुभव या परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतमध्ये राज्य सरकारने 74 मुख्याधिकारींची नियुक्ती केली आहे. त्यात कळवण, निफाड, पेठ व दिंडोरी या चार नगरपंचायतींचा समावेश असून या नगरपंचायतमध्ये दोन वर्षांसाठी नवीन मुख्याधिकारी देण्यात आले आहे व त्यांनी पदभार देखील स्वीकारला आहे.राज्यात स्थापन झालेल्या या नगर पंचायतीमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी पदच भरले नव्हते. त्यामुळे या नगरपंचायतमध्ये प्रभारी मुख्याधिकारीची प्रतीनियुक्ती करून काम सुरू होते. त्यामुळे या पदावर तहसीलदार किंवा जिल्ह्यातील दुसर्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काम करत होते. आता नव्याने भरलेल्या या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने निवड केलेल्या अधिकार्यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रशिक्षण काळातच ही नियुक्ती दिल्यामुळे केवळ मलमपट्टी करण्याचे काम शासनाने केले असून अगोदर रखडलेल्या कामांना वेग येईल का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांना शठ्ठ द्घद्बद्गद्यस्र ञ्जšड्डद्बठ्ठद्बठ्ठद्द अनुभवी मुख्याधिकारी यांच्याकडे देऊन अनुभवी मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात आली पाहिजे होती असा सूर नगरसेवकांनी व्यक्त केला.नाशिक जिल्ह्यात सात नगर पंचायतीची स्थापना दीड वर्षापूर्वी करण्यात आली. त्यात चांदवडला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रु पातंर केल्यानंतर या ठिकाणी कामात सुधारणा अपेक्षीत असतांना या नगर पंचायतीचे काम वेगवेगळ्या कारणाने रखडले. अजूनही या नगरपंचायतमध्ये नव्याने कामगारांची भरती झालेली नाही. त्यासाठी शासनस्तरावर प्रक्रि या सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत असलेला कर्मचारी वर्ग नगरपंचायतीचे काम करत आहे. त्यातच मुख्याधिकारी पद कायमस्वरु पी नसल्यामुळे या नगरपंचायतींमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये निवडणुका होवूनही कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे केंद्र व राज्याचा निधीही या नगरपंचायतीत निर्णयाविना पडून आहे. या सर्व कामांना परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांना गती द्यावी लागणार आहे. चौकटीत घ्या - विकासाचे स्वप्न सत्यात नाही --तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता . पुढे कालांतराने त्याची अंमलबजावणी सेना-भाजपा युतीच्या काळात झाली आणि त्यानुसार जिल्हय़ातील सात ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले. परिणामी कळवणवासियांना शहरीकरणाबरोबरच विकासाची स्वप्ने पडू लागली. मात्र, नगरपंचायत निर्माण होऊन दीडवर्ष झाले, तरी केवळ प्रशासनाच्या निर्ढावलेपणामुळे शहरवासियांचे विकासाचे स्वप्न सत्यात उतरले नाही.शहराच्या विकास प्रक्रि येवर परिणाम --कळवण ग्रामपंचायत बरखास्त होऊन 4 मार्च 2015 रोजी नगरपंचायत स्थापन झाली. त्यानंतर गेल्या दीड वर्षाच्या काळात नगरपंचायतीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग, अधिकारीवर्ग भरण्याकडे दुर्लक्षच झाले. कळवण तहसीलचे नायब तहसीलदार ठाकूर आणि त्यानंतर लिलके यांच्याकडे कळवण नगरपंचायतचा प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चार्ज देण्यात आला. पण कायम मुख्याधिकारी नसल्याने शहरात विकासकामे झाले नाही.शहरात नगरपंचायत हद्दीत एकूण 17 प्रभाग आहेत. कळवणचा कारभार ग्रामपंचायतच्या इमारतीमधून चालवला जात आहे. मुख्याधिकार्?यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. त्याचा विपरित परिणाम शहराच्या विकास प्रक्रि येवर झाला आहे.