शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीची अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार; आसाममध्ये वाढविली सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 09:00 IST

'एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही.'

गुवाहाटी : वैध नागरिकांची आसाममधील नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आहे. जे मूळ भारतीय आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, गरिबांना सरकारतर्फे कायदेशीर मदत पुरविली जाईल असेही सर्वानंद सोनोवाल सांगितले आहे. 

याचबरोबर, एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही. फॉरिनर ट्रायब्युनलच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी होऊन मगच त्याच्या नागरिकत्वाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. 

मुस्लिमांंमध्ये भीतीएनआरसीची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होत असल्याने आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अंतिम यादीतून आसाममधील ४१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आपण विदेशी नागरिक ठरू अशी भीती असंख्य लोकांना विशेषत: मुस्लिमांना वाटत आहे.

या यादीमध्ये अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होऊन प्रसंगी घुसखोरांनाही या यादीत स्थान मिळू शकते अशी भीती भाजप, काँग्रेस, आॅल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट आदी पक्षांनी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेला आॅल आसाम स्टुडंटस् युनियनने पाठिंबा दिला आहे.