ंखंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
ंखंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखलनागपूर : बांधकाम सुरू करायचे असल्यास एक फ्लॅट द्या किंवा ५० लाख रुपये द्या, अशी खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर क्रमांक ४१० मोहननगर येथे शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडचे इमारत बांधकाम सुरू होते. आरोपी आनंद मदनमोहन जयस्वाल आणि त्याचा अनोळखी मित्र यांनी संगनमत केले. त्यांनी शब्बीर अहमद खान (५४) रा. ३४, मानसरोवर कॉलनी, मानकापूर यांना तुम्हाला काम सुरू करायचे असेल तर बांधकामात एक फ्लॅट किंवा ५० लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...................