शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

झुंजार! दोन गोळ्या लागल्या, गंभीर जखमा झाल्या, पण दहशतवाद्यांना सोडलं नाही, भारतीय लष्कराच्या श्वानाच्या शौर्याला सलाम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 13:14 IST

Indian Army News: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक फायटर श्वान जखमी झाला. त्याचं नाव झूम असं आहे. मात्र दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक फायटर श्वान जखमी झाला. त्याचं नाव झूम असं आहे. मात्र दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला. या श्वानाच्या शौर्याची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉप्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. या कुत्र्यावर सध्या श्रीनगरमधील लष्कराच्या वेटनरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या श्वानावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता झूमची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या तुटलेल्या पायावर प्लॅस्टर करण्यात आले असून, त्याच्या चेहऱ्यावरील जखमांवर उपचार करण्यात आले आहेत. पुढच्या २४ ते ४८ तासांसाठी त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

भारतीय लष्कराने या श्वानचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. झुम नावाच्या या श्वानाला दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये झूमबाबत सांगण्यात आले की,  तो खूप प्रशिक्षित, निडर आणि कटीबद्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. झूम लष्कराच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी होत असतो. या व्हिडीओमध्ये ज्या मोहिमेदरम्यान, झूम जखमी झाला त्याची माहितीही देण्यात आली आहे.

१० ऑक्टोबर रोजी सकाळी अनंतनागमधील कोकरनाग येथे एका मोहीम सुरू झाली. त्यावेळी झूमकडे दहशतवादी जिथे लपले होते ते घर खाली करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. झूमने दहशतवाद्यांना ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी झूमला दोन गोळ्या लागल्या. मात्र गंभीर जखमा झाल्या असतानाही त्याने आपलं काम सुरू ठेवलं. त्यामुळे लष्कराला या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानdogकुत्राterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर