शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कमी लढा, जास्त जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 06:21 IST

राहुल गांधी यांचा मंत्र : काँग्रेस लढणार लोकसभेच्या ३९६ जागा

- हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४६४ जागा लढवून फक्त ४४ जागा जिंकल्या होत्या. ही काँग्रेसच्या इतिहासातील नीचांकी कामगिरी ठरली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्र, बिहार आणि केरळ या तीनच राज्यात आघाडी तर झारखंडमध्ये समझौता केला होता. यावेळी मात्र काँग्रेस फक्त ३९६ जागा लढवित असून जवळपास सर्व राज्यांत मित्रपक्षांसोबत आघाडी केली आहे. कमी जागा लढवून जास्त जागा जिंकणे, हा मंत्र राहुल गांधी यांनी या निवडणुकीत काँग्रेसला दिला आहे.

दिल्ली आणि शेजारच्या हरियाणात आम आदमी पार्टीसोबत आघाडी झाली असती तर काँग्रेस लढवित असलेल्या जागा आणखी कमी झाल्या असत्या. तथापि, जिंकण्याची शक्यता आणखी वाढली असती. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस सर्व २५ जागा लढवित आहे. त्यातून तेलगू देसम पार्टी (तेदेपा) विरोधातील मतांचे काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात विभाजन होऊन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना लाभ होणार आहे. म्हणजेच या मतांचा भाजपाला थेट लाभ होणार नाही. निवडणुकीनंतर आघाडीचा पर्यायही खुला आहे.२0१४ मध्ये काँग्रेसने बिहारात १२ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. यंदा तेथे फक्त ९ जागा लढवून ४ ते ५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. २0१४ मध्ये काँग्रेसने तामिळनाडूत सर्व ३९ जागा लढविल्या होत्या. तथापि, मिळाली मात्र एकही नव्हती. यंदा द्रमुकशी आघाडी करून काँग्रेस केवळ ८ जागा लढवित आहे. उत्त्तर प्रदेशात काँग्रेसची सपा-बसपाशी आघाडी नसली तरी यावेळी काँग्रेस फक्त ५१ जागा लढवित आहे. त्याचा फायदा सपा-बसपाला होईल. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्त्तीसगढ, पंजाब, उत्त्तराखंड जम्मू-काश्मीर आणि इशान्य भारतात चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.अनेक राज्यांत मित्रपक्षांना सोडल्या जागामहाराष्ट्रात काँग्रेसने मजबूत आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना २३ जागा सोडल्या आहेत. कर्नाटक आणि केरळ या राज्यांत काँग्रेसने अधिक लक्ष घातले आहे. या राज्यांत काँग्रेसने अनुक्रमे ९ आणि ८ जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. कर्नाटकात जेडीएससोबत आघडी करून मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. भाजपाला १८ जागांवरून खाली आणण्यासाठी हा त्याग राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडीला १६ ते १८ जागा मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. वायनाडची जागा लढवून राहुल गांधी केरळात काँग्रेसचा विस्तार करू इच्छित आहेत.