शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

Video - संतापजनक! उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांची दादागिरी; तरुणाला केली बेदम मारहाण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 16:20 IST

अर्थमंत्री आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी देखील भररस्त्यात तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.

उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल आणि एका स्थानिक तरुणात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हाणामारीची ही घटना ऋषिकेश येथील अर्थमंत्र्यांच्या घराजवळ घडली. या घटनेचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुरेंद्र सिंह नेगी नावाचा तरुण आणि मंत्री यांच्यात जोरदार हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. 

अर्थमंत्री आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी देखील भररस्त्यात तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेनंतर मंत्र्यानी शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे, लूटमार केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पीडित तरुणानेही फेसबुक पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे. काहीही केलं नसताना मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. 

सुरेंद्र सिंह नेगीने दिलेल्या माहितीनुसार, तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकला होता, त्यांच्या गाडीत कोण बसले आहे हे न बघता तो त्यांच्या कारजवळून गेला, त्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मी विरोध केल्यावर ते आपल्या गाडीतून बाहेर आले आणि खाली उतरून मारहाण करण्यास सुरुवात केली.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोलिसांना निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी कोणत्याही निरपराधांना शिक्षा होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सांगितले. मंत्र्याला बोलावून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात पक्षपाती कारवाया कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड