शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

कोरोनाविरुद्धचा लढा अजून सुरुच, शरद पवार म्हणतात 'हा' व्हिडिओ पाहाच

By महेश गलांडे | Updated: October 12, 2020 10:11 IST

देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल

ठळक मुद्देदेशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

मुंबई - कोरोनापासून सावधानता बाळगण्यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तर, सरपंचांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकजण कोरोनासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अचूक माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही सातत्याने ट्विटरवरुन कोरोनाची जनजागृती केली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे, असे पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. 

देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल, असा सावधगिरीचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करताना हा व्हिडिओ पाहण्याचं आवाहन नागरिकांना केलंय.  ''देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO ने तयार केला आहे. अवश्य पाहा, असे पवार यांनी म्हटलंय. तसेच, माझे कुटुंब-माझी जबाबदारी... असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यामुळे, नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. बाजारात किंवा समाजात वावरताना कशी काळजी घ्यायची हेच या व्हिडिओतून सांगण्यात आलंय. तर, बिनधास्तपणा हा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. 

अनलॉक करणे धाडसाचे ठरेल

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असून मृत्युदरातही घट झाली आहे. तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काही दिवसांत आणखी कमी झाला तर दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकतील, असेही टोपे यांनी म्हटले होते. टोपे यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करत डॉ. भोंडवे यांनी सांगितले की, कोरोनाबाबत कोणतेही अनुमान काढण्याइतपत सध्याची परिस्थिती नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीतून दिसत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे ठरेल. उलट अधिक काळजी घ्यावी लागेल,असेही डॉ. भोंडवे यांनी पत्रकारांना सांगितले.

मुंबईत धोका वाढला 

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख २७ हजार २७६ एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना मुंबईत मात्र रोज २,२०० ते २,८०० नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत ९,३९१ रुग्णांचे मृत्यू झाले असून रुग्णालयाधीन म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २५,३५८ एवढी झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवारWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाTwitterट्विटर