वैद्यकीय उपचारासाठी पंधरा साधू जिल्हा रुग्णालयात दाखल
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
नवीन इमारतीत उपचार : जिल्हा रुग्णालयाची ७२ तास अविरत सेवा
वैद्यकीय उपचारासाठी पंधरा साधू जिल्हा रुग्णालयात दाखल
नवीन इमारतीत उपचार : जिल्हा रुग्णालयाची ७२ तास अविरत सेवानाशिक : गत सिंहस्थ पर्वणीकाळात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन यंत्रणा पर्वणीच्या एक दिवस अगोदर व एक दिवस नंतर अशी ७२ तास सज्ज ठेवली होती़ विशेष म्हणजे आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांपासून, तर चतुर्थश्रेणी कर्मचार्यांपर्यंत सर्वच जण गत तीन दिवसांपासून रुग्णालयातच कर्तव्यावर होते़नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी पर्वणी असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास आरोग्ययंत्रणा तत्पर असावी यासाठी जिल्हा रुग्णालयासह, त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय तसेच शहरातील महानगरपालिकांचे दवाखाने सज्ज ठेवण्यात आले होते़ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ, नर्सेस, एक्स-रे टेक्निशिअन, फार्मासिस्ट, चतुर्थ श्रेणी कामगार, असे सर्वच घटक पर्वणीच्या आदल्या दिवशी व दुसर्या दिवशी असे ७२ तास कर्तव्यावर राहणार आहेत़दरम्यान, पर्वणीकाळात येणार्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात नव्याने करण्यात आलेल्या २०० बेडच्या वापर २२ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे़ आतापर्यंत या ठिकाणी ४९ साधू-महतांवर उपचार करण्यात आले असून, पर्वणीच्या दिवशी १५ साधू-महंत उपचारासाठी दाखल झाले आहेत़ या सर्वांवर उपचार सुरू असून, आणखीन दीडशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़--इन्फो--जिल्हा रुग्णालयाचे प्रवेशद्वार बंदशाही पर्वणीच्या दिवशी जिल्हा रुग्णालयाकडील ओपीडी गेट व मुख्य प्रवेशद्वारावरील एकच गेट सुरू असल्याने रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागला़ हे दोन्ही गेट उघडले असते तर त्रास सहन करावा लागला नसता, अशा प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत़फोटो :- आर / फोटो / २९सिव्हील तयारी फोटो १ व २९सिव्हील तयारी फोटो २ या नावाने सेव्ह केले आहेत़आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेले जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, तर दुसर्या छायाचित्रात साधूंवर उपचार सुरू असलेले नवीन रुग्णालय़