शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बिजापूरमध्ये भीषण चकमक, आणखी एक बडा नक्षलवादी ठार, ४० लाख रुपये बक्षीस असलेला सुधाकर मारला गेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:58 IST

Naxalite Encounter: छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफने नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर हा मारला गेल्याचं प्राथमिक वृत्त आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या व्यापक मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांच्या हाती मोठं यश लागलं आहे. छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफने नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर हा मारला गेल्याचं प्राथमिक वृत्त आहे.

छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात नॅशनल पार्क परिसरात डीआरजी आणि एसटीएफने नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानादरम्यान, नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी इतर नक्षलवाद्यांसह नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर यालाही घेरले. तसेच या चकमकीत तो मारला गेला. सुधाकर याच्यावर सरकारने ४० लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. ही चकमक बिजापूरमधील घनदाट जंगलामध्ये झाली.

बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जितेंद्र यादव यांनी सुरक्षा दलं आणि नक्षवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीला दुजोरा दिला आहे. मात्र सुधारक हा मारला गेला की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जवान या परिसरात शोधमोहिम राबवत आहेत.

दरम्यान, या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, असेही सांगण्यात येत आहे. तसेच चकमकीदरम्यान, मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड