शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 08:58 IST

Manipur News: मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. दरम्यान, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएपच्या १२८ व्या बटालियनमधील होते.

याआधी दंगेखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात एकमेकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपाल दरम्यान दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेल मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या दोन्हीकडील सशस्त्र उग्रवादी सहभागी होते. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारmanipur lok sabha election 2024मणिपूर लोकसभा निवडणूक निकाल २०२४Indian Armyभारतीय जवान