नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून असलेला ताप पळून गेला असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कार्यालयाचा पहिला दिवस कामात घालविला.माझा ताप गेला आहे. आता खूप चांगले वाटत आहे. मी दैनंदिन योगा करीत माझ्या सकाळच्या कामांना प्रारंभ केला. निवडणुकीमुळे ते शक्य नव्हते, असे केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. पाच दिवस तापाने फणफणत असतानाही केजरीवाल यांनी भेटीगाठी आणि आपले कार्यक्रम सुरूच ठेवले होते. मतमोजणीनंतर विजयोत्सव सुरू असताना ते मिरवणूक सोडून विश्रांतीसाठी घरी परतले होते. जनतेशी संवादात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या गरजेनुसार ती पुरविण्याची तयारी असल्याचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी म्हणाले.पत्रपरिषदेतून काढता पायकेजरीवाल सरकारने सोमवारी पत्रकारांची नाराजी ओढवून घेतली़ पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पत्रपरिषदेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पत्रकारांत खडाजंगी उडाली़ यानंतर सिसोदिया पत्रपरिषद सोडून निघून गेले़ आप सरकारने मीडियाला सचिवालयात जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप पत्रकारांनी यानिमित्ताने केला़ पत्रकारांना सचिवालयाच्या आत जाण्यापासून रोखण्यात आले़ मंत्रिमंडळाची बैठक आटोपून बाहेर आलेले मनीष सिसोदिया यांच्याकडे पत्रकारांनी याबाबत तक्रार नोंदवली़ पत्रकारांनी सिसोदिया यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला़ मात्र सिसोदिया यांनी या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)दरम्यान, आम आदमी पार्टीने पत्रकारांना सचिवालयात परवानगी नाकारल्याच्या मुद्यावर कानावर हात ठेवले़ हा निर्णय सचिवालयात आधीपासून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता़ पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे़ मात्र याउपरही सरकार अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मुद्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करेल, असे पक्षप्रवक्ते आतिशी मलेर्ना यांनी सांगितले़४अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण सहकार्य द्या, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सोमवारी दिल्ली पोलिसांच्या ६८ व्या स्थापना दिनाच्या पथसंचलन कार्यक्रमात ते बोलत होते.
ताप पळाला, केजरीवाल लागले कामाला!
By admin | Updated: February 17, 2015 02:40 IST