शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

२५ लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार; रायफल आणि दारूगोळा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:10 IST

छत्तीसगडमधील विजापूर आणि दंतेवाडा सीमेवर सोमवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

Bijapur Naxal Encounter:छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाला यश मिळत आहे. सोमवारी सकाळपासून  दंतेवाडा-विजापूर सीमेवर परिसरात सुरु असलेल्या चकमकीतही सुरक्षा दलाला मोठं यश हाती आलं. सुरक्षा दलाच्या चकमकीत एक जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिला नक्षलवाद्याच्या डोक्यावर २५ लाखांचे बक्षीस होतं. महिला नक्षलवाद्याकडून एक इन्सास रायफलही जप्त करण्यात आली आहे. 

छत्तीसगडमधील विजापूर आणि दंतेवाडा सीमेवर सोमवारी सकाळी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत जवानांनी एका महिला नक्षलवाद्याचा खात्मा केला. जवानांनी महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यास सुरु केली. त्यावेळी ही महिला नक्षलवादी रेणुका उर्फ बानू उर्फ सरस्वती असल्याचे समोर आलं. रेणुकावर २५ लाखांचे बक्षिस होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळावरून इन्सास रायफल, स्फोटके आणि अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.

रेणुका ही तेलंगणाच्या वारंगल इथली होती.ती दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीच्या प्रेस टीमची प्रभारी होती. अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये रेणुकाचा सहभाग होता. दुसरीकडे गेल्या आठवड्यात दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार केले होते. दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत २५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली मारला गेला. मुरली उर्फ ​​सुधीर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता.

दरम्यान, सुरक्षा दलाचे डीआरजी पथक दंतेवाडा येथील गीदाम आणि विजापूरमधील भैरमगढ पोलीस स्टेशनच्या सीमावर्ती गावातील नेलगोडा, एकेली आणि बेलनार या भागात नक्षलविरोधी अभियाना राबवत आहे. सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाला. यामध्ये सुरक्षा दलांनी रेणुकाला ठार केले. दुसरीकडे, बस्तर रेंजमध्ये या वर्षात आतापर्यंत ११९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी