शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

उलगडला फैय्याज यांचा सुरेल प्रवास

By admin | Updated: February 8, 2015 02:43 IST

शास्त्रीय, नाट्यगायन ते बैठकीची लावणी असा एक सुरेल प्रवास रसिकांनी अनुभवला. निमित्त होते ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या मुलाखतीचे.

प्रसन्न पाध्ये - बेळगावसदाशिव अमरापूरकर सभागृह : शास्त्रीय, नाट्यगायन ते बैठकीची लावणी असा एक सुरेल प्रवास रसिकांनी अनुभवला. निमित्त होते ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या मुलाखतीचे. उत्तरोत्तर रंगत गेलेली ही शब्द सुरांची मैफल हृदयाचा ठाव घेणारी ठरली.नाट्य संमेलनाअंतर्गत फैय्याज यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम झाला. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांना बोलते केले. तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, अशोक देशपांडे आणि आसावरी भोकरे यांनीही त्यांच्याशीसंवाद साधला.आई गळा चांगला होता, पण बालपण आजीकडे गेल्याने तसा संगीत, नाटकाचा वारसा आपल्याला नाही. लेखन वाचनाची आवड होती. मलाही गाण्याचे वेड आहे, हे समजल्यापासून तंबोरे खुंटीला टांगले गेले. त्यामुळे वारसा असा नाही, असे फैयाज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कालावधीत नाट्य परिषदेकडून काय करुन घ्यायला आवडेल या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘‘अध्यक्षपदाला अधिकार किती आहेत, हे माहिती नाही. मात्र संगीत रंगभूमीसाठी अधिक प्रयत्न करायला आवडेल. नाट्य परिषदेने कार्यशाळा भरविल्यास शिकवायला निश्चित आवडेल. नव्या कलाकारांना गाण्याचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. षड्ज कसा लावला पाहिजे हे त्यांनी उदाहरणासह सांगितले.‘मत्सगंधा’ची आठवण सांगतांना त्यांनी मत्सगंधातील गाणी आशाबार्इंनी गायली होती. पण मला माझं गाणं म्हणून गायचे होते. त्या प्रमाणे मी ते गायले, असे सांगितले.संगीत रंगभूमी हा आपला ठेवा आहे. तो जपलाच पाहिजे. पण काळानुरुप सादरीकरणात बदल केले पाहिजेत. नाटकाला ट्रॅकवर संगीत देण्यात काही वावगे नाही,असे त्यांनी ‘लेकुरे उदंड..’चे उदाहरण दिले. आजच्या तरुणाईला काय हवे याचा विचार केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फैयाज यांना नकला करण्याची गोडी आहे. तोही प्रश्न या मुलाखती दरम्यान आला. त्या वेळी त्यांनी पणशीकर, वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा याच बरोबर दादा कोंडके यांचीही नक्कल करुन दाखविली. ‘विच्छा..’च्या वेळीच्या प्रसंगांना उजाळा देतांना त्यांनी आशातार्इंनी कुंकू लावण्यास सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली. बेगम अख्तर यांची गझल सादर करुन त्यांनी शब्दमैफलीचा समारोप केला.