शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 06:17 IST

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतीक्षित चांद्रयान-२ ही मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क ३ च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली.

- निनाद देशमुख श्रीहरीकोटा : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतीक्षित चांद्रयान-२ ही मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क ३ च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे प्रक्षेपणापूर्वी प्रक्षेपकाची तपासणी करताना ही त्रुटी आढळल्याने, मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १० दिवसांत बिघाडाच्या कारणांची तपासणी करून, त्यानंतर प्रक्षेपणाची पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी करण्यात येणार होते. त्यासाठी काउंटडाउनही सुरू झाले होते. प्रत्यक्ष प्रक्षेपणाला ५६ मिनिटे २४ सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला. यामुळे प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोतर्फे करण्यात आली.प्रक्षेपणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचबरोबर, सुमारे ५ हजार जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण जगभरातून या प्रक्षेपणाचे वार्तांकन करण्यासाठी अनेक नामांकित वृत्त समूहांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.रात्री १० वाजता चेन्नई येथून विशेष गाडीतून पत्रकारांना हा सोहळा जगभरात दाखविण्यासाठी श्रीहरीकोटा येथे नेण्यात आले. सकाळपासून प्रक्षेपणाची उलटीगणती सुरू करण्यात आली होती.इस्रोचे अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, प्रक्षेपणाच्या दरम्यान शास्त्रज्ञांना प्रक्षेपकात काही त्रुटी आढळल्या. यामुळे प्रेक्षपण स्थगित करण्यात आले असून, काही दिवसांत नवी तारीख जाहीर करण्यात येईल. मुख्य नियंत्रण कक्षातून शास्त्रज्ञ प्रत्येक क्षणाची माहिती देत होते. शास्त्रज्ञांची तयारी पाहण्यासाठी, तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रपती या कक्षात उपस्थित होते. २ वाजता प्रक्षेपणाला ५६.२४ मिनिटे उरली होती.यावेळी मोहीम प्रमुखांना प्रक्षेपकाच्या इंधनाच्या टाकीत त्रुटी आढळली. यामुळे प्रक्षेपण काही काळापुरते स्थगित केल्याचे सांगण्यात आले, परंतु मोहीम सुरू होण्यापूर्वीच इस्रोच्या शास्त्रज्ञांना ही तांत्रिक त्रुटी मोठी असल्याचे लक्षात आल्यामुळे, त्यांनी ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.>छोटीशी चूकही ठरूशकते धोकादायकअंतराळात यान सोडण्याच्या कुठल्याही मोहिमेत मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जाते. छोट्याशा त्रुटींमुळे अपघाताची शक्यता असते. चांद्रयान-२ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. मोहिमेच्या यशासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ ११ वर्षांपासून झटत आहेत, यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.यामुळे थोडीही त्रुटी ही संपूर्ण मोहीम उद्ध्वस्त करू शकते. यामुळेच तूर्तास प्रक्षेपण स्थगित करण्यात आले आहे. ही मोहीम यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत तांत्रिक बिघाड शोधल्यावर नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2