शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या संरक्षणासाठी वडील बनले बंदूकधारी; भटक्या कुत्र्यांपासून करणार संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 09:15 IST

आपल्या मुलांना मदरशात नेताना समीर यांनी सोबत बंदूक बाळगण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास खूप वाढला आहे. त्यामुळे तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केल्याने पालक चिंतित आहेत. या राज्यातील कासारगोड येथे समीर या गृहस्थाने आपल्या मुलांना मदरशामध्ये नेताना सोबत बंदूक बाळगली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून मुलांना वाचविण्यासाठी त्यांनी हा उपाय योजला आहे.  

आपल्या मुलांना मदरशात नेताना समीर यांनी सोबत बंदूक बाळगण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. समीर म्हणाले की, मदरशात जाताना वाटेत अनेक भटकी कुत्री अंगावर येतात. त्यांनी मुलांवर हल्ला करू नये म्हणून मी सोबत बंदूक बाळगतो. समीर यांचा उपाय चुकीचा आहे असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे, तर काहींनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. कासारगोडमधील बेकाल भागात भटके कुत्रे माणसांना चावल्याच्या अनेक घटना घडल्याने लाेकांमध्ये दहशत  आहे. (वृत्तसंस्था)

बदलली भूमिका!कोडिकोळच्या महापौर बीना फिलीप यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याच्या काही घटना उजेडात आल्या होत्या. अशा प्रकारे कोणत्याही प्राण्याला ठार मारण्याच्या कृतीचा मी निषेध केला होता. मात्र, मी या भूमिकेत बदल केला आहे. आता लहान मुलांवर भटके कुत्रे हल्ले करीत आहेत. त्याचा लोक प्रतिकार करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत  लोकांना दोषी ठरविता येणार नाही.

भटक्या कुत्र्यांचा त्रासकेरळ राज्यात भटके कुत्रे व माणसे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. गेल्या काही दिवसांत या कुत्र्यांनी लहान मुलांसहित इतर लोकांवरही हल्ले करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.