शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वडील आमदार, मुलगा विधानसभेमध्ये शिपाई! विरोधकांनी सरकारवर केला वशिलेबाजीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:21 IST

वडील राजकारणात असले की त्यांची मुले अनेकदा राजकारणात येतात. पण राजस्थानात भाजपा आमदाराच्या मुलाला विधानसभेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली आहे. तो १२वीपर्यंत शिकला आहे. मात्र एमबीए, पीएच.डी. उमेदवारांना बाजूला सारून आमदारपुत्राला नोकरी मिळाल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.

जयपूर : वडील राजकारणात असले की त्यांची मुले अनेकदा राजकारणात येतात. पण राजस्थानात भाजपा आमदाराच्या मुलाला विधानसभेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली आहे. तो १२वीपर्यंत शिकला आहे. मात्र एमबीए, पीएच.डी. उमेदवारांना बाजूला सारून आमदारपुत्राला नोकरी मिळाल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.आमदार जगदीश नारायण मीणा हे भाजपाचे नेते आहेत. ते दलित आहेत. त्यांचा मुलगा राम किशन याची १८ हजार ८ उमेदवारांतून शिपाई म्हणून निवड झाली. शिपाई या पदासाठी १८ जणांची निवड करण्यात आली. त्यात त्याचा १२वा क्रमांक लागला.मुलाखतीनंतर रामकिशनची निवड झाल्याचे समितीने म्हटले आहे, तर त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही, असे मीणा म्हणाले. भावंडांची तसेच शेतीची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही, असेही मीणा यांनी सांगितले.मात्र काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मीणा हे आमदार असल्यामुळेच त्यांच्या मुलाला लगेच नोकरी मिळाली, असा आरोप केला. या भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. भाजपा सरकारने तरुणांना १५ लाख नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्ताधारी पक्षाचे नेते, कुटुंबीय आणि नातेवाइकांना नोकºया दिल्या जात आहेत, असा टोला राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी लगावला. (वृत्तसंस्था)या आधीही असाच घडला प्रकारयाआधी भाजपाचे आमदार हिरालाल वर्मा यांच्या हंसराज या मुलाला शिपाई अजमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी मिळाली होती. हंसराज केवळ आठवी शिकला होता. त्याने राजकारणात येऊ नये, असे माझे म्हणणे होते आणि आहे, असे वर्मा म्हणाले होते.