डबवाली : सिरसाच्या गोरिवाला गावातील उपतहसील कार्यालयात सोमवारी दोन सुनांनी सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. तेथे उपस्थितांनी बघ्याची भुमिका घेतली. यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर चौकशीत खरा प्रकार समोर आला आहे.
मनी राम यांनी 21 एकर जागेचा व्यवहार 28 लाखांमध्ये केला होता. खरेदीदाराने चेकद्वारे ही रक्कम दिली होती. सोमवारी या जमिनीची नोंदणीही होणार होती. यासाठी मनी राम नोंदणी कार्यालयात गेले होते. नोंदणी होण्याआधीच मनीराम यांच्या दोन सुना तहसील कार्यालयात पोहोचल्या.
इकडे तहसीलदारांनी घेतलेल्या भुमिकेवर शंका उपस्थित झाल्यावर त्यांनी खुलासा केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी स्टे न दिल्याने नोंदणी रोखू शकत नव्हतो. यामुळे कागदपत्रांवर शेरा ओढला होता. आपण सव्वा पाच वाजेपर्यंत वाट पाहत होतो. मात्र, मनी राम फोटोसाठी आला नाही. त्यानंतर मला समजले की सुनांनी त्याला मारहाण केली आहे. यामुळे पोलिसांना बोलावले. वादामुळे जमीन व्यवहाराची नोंदणी आज झाली नाही, असे नायब तहसीलदार महेंद्र कुमार यांनी सांगितले.