शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:31 IST

Video - वडिलांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ६० फूट खोल बोरवेलमध्ये उडी मारली.

अहमदाबादच्या चांदलोडियामधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ६० फूट खोल बोरवेलमध्ये उडी मारली. १५ डिसेंबरच्या रात्री गजराज सोसायटीमधील जैन देरासरजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे नागरिक भावूक झाले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्वजण वडिलांच्या धैर्याला सलाम करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एका चिमुरडीचा पाय अचानक घसरला आणि ती पाण्याने भरलेल्या खोल बोरवेलमध्ये पडली. आपल्या मुलीला डोळ्यांदेखत बोरवेलमध्ये पडताना पाहून वडील घाबरले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी थेट बोरवेलमध्ये उडी मारली. लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे मोठा जमाव जमा झाला. उपस्थितांनी वडील आणि मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बोरवेलमध्ये खूप खोल असल्याने आणि त्यात पाणी असल्याने त्यांना बाहेर काढणं कठीण झालं होतं.

अग्निशमन दलाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली. तोपर्यंत बाप-लेक पाण्यात बुडण्याची भीती वाढत चालली होती. आजूबाजूचे लोक देवाकडे प्रार्थना करत होते. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुमारे २० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर वडील आणि मुलगी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

दोघांवर उपचार सुरू

बाहेर काढल्यानंतर दोघांनाही तातडीने सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, वेळेवर बचावकार्य झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना केवळ पित्याचे निस्वार्थ प्रेमच दर्शवत नाही, तर उघड्या आणि असुरक्षित बोरवेल संदर्भात प्रशासन आणि समाजाच्या जबाबदारीवरही मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Brave Father Jumps into 60-Foot Borewell to Save Daughter

Web Summary : In Ahmedabad, a father bravely jumped into a 60-foot borewell to rescue his daughter. Firefighters successfully rescued both after a 20-minute operation. They are currently receiving treatment in hospital. The incident highlights a father's love and concerns about open borewells.
टॅग्स :ahmedabadअहमदाबादSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया