शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Father-in-law's Property: सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा हक्क? उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:50 IST

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कुमार यांनी हा निकाल दिला. केरळच्या कन्नूर येथील तैलीपरंबा येथील रहिवासी डेव्हिस राफेलचे अपील फेटाळले आहे.

सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या जावयांना धक्का देणारा निकाल आला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला कोणाताही कायदेशीर अधिकार नसल्याचे म्हटले आहे. जावई सासऱ्याच्या संपत्तीत किंवा घरात हक्क सांगू शकत नाही, असे म्हटले आहे. 

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कुमार यांनी हा निकाल दिला. केरळच्या कन्नूर येथील तैलीपरंबा येथील रहिवासी डेव्हिस राफेलचे अपील फेटाळले आहे. डेव्हिसने त्याचे सासरे हेन्ड्री थॉमस यांच्या मालमत्तेवर दावा केला होता. डेव्हिसला आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्यापासून आणि मालमत्ते हस्तक्षेप करणे आणि घराच्या शांतता बिघडविण्यापासून रोखण्यासाठी सासरा हेन्ड्रीने प्रतिबंधात्मक आदेश देण्याची विनंती कनिष्ठ कोर्टाकडे केली होती. 

फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्चकडून ही मालमत्ता भेट म्हणून मिळाल्याचा दावा हेन्ड्रीने केला. त्यांनी स्वत:च्या पैशांतून पक्के घर बांधले असून ते तेथे कुटुंबासह राहत आहेत. या मालमत्तेवर आपल्या जावयाचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला. 

यावर डेव्हिस यांनी युक्तीवाद मालमत्तेची मालकी वादातीत आहे. ती चर्चच्या अधिकार्‍यांनी देणगीच्या कराराद्वारे कुटुंबाला दिली होती. हेंड्रीच्या एकुलत्या एक मुलीशी त्याचे लग्न झाले आहे. लग्नानंतर त्याला त्याच कुटुंबाने दत्तक घेतले आहे. म्हणून त्यालाया घरात आणि मालमत्तेमध्ये राहण्याचा अधिकार आहे. मात्र, उच्च न्यायालयाने त्याचे काहीच मान्य न करता सासऱ्याच्या मालमत्तेवर अधिकार नसल्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितले की, जावई हा सासरच्या कुटुंबातील सदस्य आहे हे सांगणे कठीण आहे. हेंड्रीच्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्याला कुटुंबाने दत्तक घेतले होते हे सांगणेही जावयासाठी लाजिरवाणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालय