शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'बाप'माणूस... दंगलखोरांनी मुलाला ठार मारल्यानंतरही 'तो' शांततेचं आवाहन करत राहिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:12 IST

धर्माच्या नावावर पेटलेल्या या आगीतही सामाजिक सलोख्याचं एक उदाहरण बघायला मिळालं आहे. 

आसनसोल : पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये रामनवमीच्या दिवसापासून पेटलेल्या धार्मिक दंगली अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. राज्यातील काही शहरं गेल्या चार दिवसांपासून आगीने होरपळताहेत. आसनसोल आणि रानीगंजमध्ये दंगलीत आत्तापर्यंत चार लोकांना जीव गमवावा लागला आहे. पण धर्माच्या नावावर पेटलेल्या या आगीतही सामाजिक सलोख्याचं एक उदाहरण बघायला मिळालं आहे. 

आसनसोलमधील धार्मिक दंगलीत एका मशिदीतील इमामाच्या 16 वर्षांच्या मुलाची हत्त्या करण्यात आली. इतक्या तरुण मुलाला गमावल्यानंतरही इमाम इसदादुल रशीदी यांनी शहर जळण्यापासून वाचवलं. गुरुवारी शांतता ठेवण्याचं आवाहन करताना म्हणाले की,  सूड घेण्याची भाषा कराल तर मस्जिद आणि शहर सोडून जाणार.

आसनसोलच्या एका मशिदीत जवळपास तीस वर्षांपासून मौलाना इमदादुल रशीदी इमाम म्हणून काम पाहत आहेत. रामनवमी दरम्यान भडकलेल्या धार्मिक दंगलीत त्यांचा 16 वर्षांचा मुलगा सिबतुल्ला रशीदी याची हत्त्या करण्यात आली. 

या घटनेची माहिती मिळताच आसनसोलच्या मशिदीसमोर हजोरोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. जमा झालेल्या संतप्त लोकांना इमाम रशीदी यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सूड घेण्याचा विचार कराल तर मी मस्जिद आणि शहर सोडून जाणार. आणखी कुणाचाही मुलगा दगावला जावू नये असे मला वाटते.   

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मृत सिबतुल्ला रशीदी याने याचवर्षी दहावीची परीक्षा दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलखोरांनी त्याला पळवले होते. बुधवारी उशिरा रात्री त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याला गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.सिबतुल्लाचे वडील इमाम इमदादुल रशीदी म्हणाले की, तो बाहेर गेला तेव्हा दंगल सुरु होती. काही लोकांनी त्याला धरुन नेले. माझ्या मोठ्या मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. तर पोलिसांनी त्याला बाहेर वाट पाहण्यास सांगितले. नंतर अशी माहिती देण्यात आली की, पोलिसांना मृतदेह मिळाला आहे. या मृतदेहाची ओळख दुस-या दिवशी सकाळी पटवण्यात आली.