देशी दारु दुकान बंद करण्यासाठी बहुजन विकास अभियानचे उपोषण
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
लातूर : चाकूर तालुक्यातील गांजूरवाडी, अष्ठामोड येथे भोगस कागदपत्राच्या आधारे देशी दारुचे दुकान थाटले आहे़ हे देशी दारुचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन विकास अभियानच्या वतीने मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे़
देशी दारु दुकान बंद करण्यासाठी बहुजन विकास अभियानचे उपोषण
लातूर : चाकूर तालुक्यातील गांजूरवाडी, अष्ठामोड येथे भोगस कागदपत्राच्या आधारे देशी दारुचे दुकान थाटले आहे़ हे देशी दारुचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन विकास अभियानच्या वतीने मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे़ बहुजन विकास संघटनेच्या वतीने गांजूरवाडी येथील बोगस कागदपत्राच्या आधारे थाटण्यात आलेले देशी दारुचे दुकान त्वरीत बंद करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे़ गांजूरवाडी येथे आडवी बाटली, उभी बाटली, यासाठी मतदान घेण्यात यावे, आष्टामोड व गांजूरवाडीचा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने या देशी दारुच्या दुकानाचा नाहरकत परवाना रद्द करावा, बोगस कागदपत्राच्या आधारे या दुकानाला नाहरकत दिली, याची चौकशी करा़ सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर खोट्या कागदपत्राच्या आधारे दारु दुकानला परवानगी दिली म्हणून कार्यवाही करण्यात यावी, अशा विविध मागण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे़ यावेळी बापुसाहेब कांबळे व महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सुमन सूर्यवंशी, संजयकुमार, राजकुमार गाथाडे, नरसिंग गुर्मे, रमेश गुडसुरकर, सुभाष सूर्यवंशी, पप्पु शेवाळे, राजकुमार कारभारी, कमल सकट, वंदना कांबळे, आदींची उपस्थिती होती़