नाशिक- अंबड येथील त्रिमूर्ती प्लाझा या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करणार्या विकासकाचा पूर्णत्वाचा दाखला रद्द करावा, या मागणीसाठी या इमारतीतील रहिवासी संजय विठ्ठल भोळे यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.अंबड येथील सर्व्हे नंबर ३०४/१ या ठिकाणी असलेल्या त्रिमूर्ती प्लाझामध्ये मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला रद्द करावा, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची योग्य तपासणी न करणार्या आणि चुकीचा अहवाल देणार्या अभियंत्यावर कारवाई व्हावी, अशा मागण्या भोळे यांनी केल्या आहेत.
बेकायदा बांधकामाच्या विरोधात उपोषण
By admin | Updated: May 27, 2014 00:10 IST