शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:06 IST

Farooq Abdullah Travel in Srinagar Vande Bharat Express Train: कटरा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, माता ने बुलाया है. शेरावाली का बुलावा आया है.

Farooq Abdullah Travel in Srinagar Vande Bharat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कटरा आणि श्रीनगर यादरम्यान धावणाऱ्या दोन खास वंदे भारत रेल्वे ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी २-३ तासांनी कमी झाला आहे. तसेच काश्मीर खोऱ्याशी सर्व ऋतूंमध्ये संपर्क राखता येईल, असा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. यातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी याच वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला. ही ट्रेन चिनाब नदीवरील पुलावर येताच फारूक अब्दुल्ला भावुक झाल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फारुक अब्दुल्ला वंदे भारत ट्रेनमधील या प्रवासादरम्यान बोलताना सांगितले की, ही वंदे भारत ट्रेन जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी सर्वांत मोठी भेट आहे. नौगाम (श्रीनगर) रेल्वे स्टेशनवरून फारुक अब्दुल्ला यांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवासाला सुरुवात केली आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास केला. या ट्रेनमुळे केवळ आमचे पर्यटनच नाही तर आमचा व्यापारही वाढेल. आमची उत्पादने कन्याकुमारी, पटना, कोलकाता, मुंबई येथे पोहोचतील. याचा आम्हाला खूप फायदा होईल. आमचे स्वप्न होते की, एक दिवस जम्मू-काश्मीर देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल आणि हे स्वप्न या ट्रेनमुळे पूर्ण होत आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो, असे फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

चिनाब नदीवरील पुलावर वंदे भारत ट्रेन आली अन् फारुक अब्दुल्ला भावुक झाले

कटरा-श्रीनगर रेल्वे लिंकद्वारे काश्मीर खोरे पहिल्यांदाच संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. जम्मू आणि काश्मीरला ही सर्वांत मोठी भेट आहे. चिनाब पूल ओलांडताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. अखेर तो दिवस आला आहे जेव्हा आपण काश्मीरहून देशात रेल्वेने प्रवास करू शकू, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. तसेच यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही आठवण काढली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या चिनाब पूल प्रकल्पामध्ये योगदान दिले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रेल्वेने काश्मीरला येण्याचे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प पूर्ण केला, असे ते म्हणाले.

दरम्यान, कटरा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "माता ने बुलाया है. शेरावाली का बुलावा आया है". दुसरीकडे, काश्मीर रेल्वे मार्गातील कटरा-बनिहाल या दरम्यानचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे अंजी खड्ड पूल. हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. ७२५ मीटर लांब आणि ३३१ मीटर उंचीचा हा पूल २६ केबलवर उभा आहे आणि पर्यटकांसाठी ते एक खास आकर्षण आहे.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला