शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Farmers Protest: टिकैत यांच्याशी चर्चेसाठी सरकारची दुहेरी रणनीती; केंद्रीय गृहमंत्रालयाची उच्चपातळीवर बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:24 IST

टिकैत यांनी त्यांच्या आधाराचा पायाच प्रत्यक्षात गमावलेला असल्यामुळे त्यांना या परिस्थितीत सिंघू सीमेवरून बळाचा वापर करून दूर करून काहीही साध्य होणार नाही.

हरीश गुप्तानवी दिल्ली : आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांचे बळ घटल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार दोन प्रकारची रणनीती वापरत आहे. सध्या टिकैत सिंघू सीमेवर आघाडी सांभाळून आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी उच्च पातळीवर बैठक झाली. आंदोलनाला जनतेची सहानुभूती असल्यामुळे टिकैत यांच्याविरोधात बळाचा वापर न करण्याचे ठरले. कथित ४२ संघटनांपैकी मोजक्या संघटना सभोवताही दिसत असून मोजके शेतकरी दिल्लीच्या सीमांवर दिसतात.

हे शेतकरी धरणे आंदोलन जेथे करीत आहेत त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याचे काम दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलीस करीत आहेत. त्यानुसार आंदोलनाच्या जागी कोणालाही जाता येणार नाही व तेथून बाहेर पडता येणार नाही. शेतकऱ्यांना पाणी, वीज व आवश्यक गोष्टी मिळताहेत.सरकारने राकेश टिकैत यांच्याशी चर्चेसाठी मागचे दार खुले केले आहे. कारण त्यांनी ‘मी सरकारशी बोलण्याच्या विरोधात नाही’, असे वारंवार सांगितले होते. टिकैत गुरुवारी रात्री दूरचित्रवाणी वाहिन्यांवर रडताना दिसले व त्याचा काहीसा परिणाम त्यांच्या अनुयायांवर झाला.संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केलेल्या त्यांच्या अभिभाषणात तिन्ही कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती दिली गेली आहे, अशी वस्तुस्थिती सांगितली. 

दुसरे म्हणजे सरकारला जाणवले की, टिकैत यांनी त्यांच्या आधाराचा पायाच प्रत्यक्षात गमावलेला असल्यामुळे त्यांना या परिस्थितीत सिंघू सीमेवरून बळाचा वापर करून दूर करून काहीही साध्य होणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, दिल्लीच्या सीमांकडे कोणताही मोर्चा येणार नाही याची काळजी घ्यावी. “टिकैत यांना दमवून नंतर चर्चा करण्याची ही वेळ आहे. चर्चेसाठी समिती स्थापन करण्याची आमची इच्छा आहे, ” असे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. ‘मी फक्त सरकारशी बोलेन. कारण लवकर तोडगा काढण्यासाठी माझ्यावर दडपण आहे. कारण शेजारच्या खेड्यांतूनही दबाब वाढतो आहे, असे टिकैत यांनी जाहीर केले होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय