शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

Farmers Protest: शेतकऱ्यांचे आज सामूहिक उपोषण; देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 3:56 AM

तीनही कृषी कायदे सरकारने मागे घेण्याच्या मागणीवर ठाम

नवी दिल्ली : केंद्राने केलेेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून, सोमवार, १४ डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शेतकरी संघटनांचे नेते सोमवारी सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या सिंघू सीमेवर संयुक्त पत्रकार परिषदेत  नेते गुरनामसिंग चदुनी आंदोलनाची रुपरेषा मांडली. काही संघटना आंदोलन मागे घेत असून, कायद्यांना आमचा पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. मात्र, आमचा त्या संघटनांशी काहीही संबंध नसून सरकार कायदे मागे घेत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार चदुनी यांनी केला. सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून, सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. शहाजहाँपूर महामार्ग बंद करण्याच्या आंदोलनात हनन मोल्ला, डॉ.अशोक ढवळे, राजू शेट्टी, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव, सत्यवान, कविता कुरुगंटी, वेंकटरामय्या हे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच आमरा राम, पी.कृष्ण प्रसाद, विजू कृष्णन, मेजर सिंह, सुरेंद्र सिंह, फुलसिंह शेवकंद, विक्रम सिंह, उषा राणी, मयुख विश्वास आणि इतर नेते सहभागी झाले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमहानिरीक्षकांनी दिला राजीनामा आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी  शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. महामार्ग रोखलाजयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत.