शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही- अर्थराज्यमंत्री डॉ. कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 05:14 IST

शेतकऱ्यांना कर्जातून काही सवलत देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे काय? अशी विचारला केल्यानंतर डॉ. भागवत यांनी बँकांच्या थकीतदारांमध्ये वर्गीकरण केले जाणार नाही. जे थकीतदार आहेत, त्यांच्याकडून कर्जाची वसुली केली जाईल, असे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट केले.यासंदर्भात काँग्रेसचे के. सी. वेणूगोपाल यांनी पूरक प्रश्न विचारला होता. बँकांकडे मोठ्या उद्योजक व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज थकित आहे. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. परंतू व्यापारी व शेतकऱ्यांच्या कर्जाला एकाच दृष्टीने पाहणे योग्य नाही. शेतकऱ्यांना कर्जातून काही सवलत देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे काय? अशी विचारला केल्यानंतर डॉ. भागवत यांनी बँकांच्या थकीतदारांमध्ये वर्गीकरण केले जाणार नाही. जे थकीतदार आहेत, त्यांच्याकडून कर्जाची वसुली केली जाईल, असे स्पष्ट केले.यावेळी शिवसेनेचे अनिल देसाई यांनी बँकांच्या वाढत्या एनपीएबद्दल विचारणा केली होती. थकीतदारांकडून वसुली करण्यासाठी अर्थविषयातील तज्ज्ञाची बँकेमार्फत नियुक्ती केली जाते. त्यांच्याकडून अधिकाधिक रक्कम वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न राहत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.साथ रोगासाठी यंत्रणा मजबूत- डॉ. भारती पवारकोरोनानंतर साथीच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. यासंदर्भात टीएमसीचे डेरेक ओब्रायन यांनी पूरक प्रश्न विचारला होता. तालुका स्तरावरील रुग्णालयात साथीच्या रोगाच्या तपासणी करण्याची यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे तसेच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.