शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, १५ ऑगस्टला ट्रॅक्टर मार्चची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:12 IST

Farmer Protest: सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी शेतकऱ्यांकडून देशभरामध्ये ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना संघू आणि शंभूसह दिल्लीला जोडणाऱ्या सीमेवर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या दिवशी ट्रॅक्टर मोर्चासह नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रती जाळण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.  

शेतकरी संघटनांनी १ ऑगस्ट रोजी मोदी सरकारची तिरडी जाळण्याचाही निर्णय घेतला आहे. यादरम्यान, एमएसपीवर कायदेशीर गॅरंटीसह जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची रणनीती आखली आहे. यादरम्यान क्रिमिनल लॉची कॉपीसुद्धा जाळली जाईल. तसेच देशभरातील शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा विरोध करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शंभू बॉर्डरवर महिनाभराचा शिधा घेऊन शेतकरी पोहोचत आहेत.

दरम्यान, शंभू बॉर्डरवर शेतकरी बऱ्याच दिवसांपासून ठाण मांडून बसलेले आहेत.  ३१ ऑगस्ट रोजी या आंदोलना २०० दिवस पूर्ण होतील. शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांनी बॉर्डरवर पोहोचावे असे आवाहन केले आहे. तर हरियाणामध्ये १५ सप्टेंबर रोजी जिंद येथे आणि २२ सप्टेंबर रोजी हरियाणामधील पीपली येथे शेतकऱ्यांच्या सभेचं आयोजन केलं आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनी माजी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्रा आशिष टेनी यांना जामीन देण्याच्या निर्णयालाही विरोध केला आहे. 

हमिभावासह १२ मागण्या घेऊन पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. मात्र त्यांना शंभू बॉर्डर येथे रोखण्यात आले. दरम्यान, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बंद करण्यात आलेली शंभू बॉर्डर एका आठवड्यात खुली करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्याची मुदत १७ जुलै रोजी संपुष्टात आली आङे. मात्र या प्रकरणी हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार