शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आज जुन्या संसदेला निरोप, नव्यात प्रवेश; PM, MP, उपराष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष साक्षीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 08:26 IST

सकाळी ९:३० पासून जुन्या संसदेत सर्व खासदारांसोबत छायाचित्रे काढली जातील.

संजय शर्मा नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नव्या संसदेतसंसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जुन्या संसदेच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या संसदेला निरोप देण्याची वेळ आता आली आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी नवीन संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेतील सर्व खासदार, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि अध्यक्ष ओम बिरला फोटो सेशन करतील. हा फोटो जुन्या संसदेच्या निरोप समारंभाचा असेल जो एक ऐतिहासिक क्षण असेल. 

सकाळी ९:३० पासून जुन्या संसदेत सर्व खासदारांसोबत छायाचित्रे काढली जातील.त्यासाठी त्यांना लवकर बोलावण्यात आले आहे.  यानंतर सकाळी जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची संयुक्त बैठक होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे निरोपाचे भाषण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जुन्या संसदेशीही जोडला गेला आहे. संसदीय परंपरा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत स्वतंत्र भारताची ७५ वर्षे या जुन्या संसदेत गेली. स्वतंत्र भारताची राज्यघटनाही इथेच तयार झाली. देश चालविण्यासाठी कायदेही इथूनच बनवले गेले. 

नवीन ड्रेस कोड नव्या संसदेतील प्रवेशाबरोबरच आजपासून खासदारांचा गणवेशही बदलणार आहे. मंगळवारपासूनच सर्व खासदारांना गुलाबी रंगाचा कमळाच्या फुलांचा शर्ट, खाकी पॅन्ट आणि जॅकेट परिधान करावे लागणार आहे.  

पक्ष कार्यालये कधी?संसदेतील सर्व राजकीय पक्षांना अद्याप कार्यालयीन खोल्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे या विशेष अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाचे संसदीय कार्यालय नवीन संसदेत स्थलांतरित केले जाणार नाही. आता विशेष अधिवेशनानंतर राजकीय पक्षांची कार्यालये संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नव्या संसदेत स्थलांतरित होऊ शकतील.

मीडिया कक्ष हटविले जुन्या संसदेतील गेट क्रमांक १२ आणि गेट क्रमांक ४ समोर उभारलेले मीडिया कक्ष हटविण्यात आले आहेत. नवीन संसदेबाहेर मीडिया कक्ष अजून बनवलेले नाहीत. सध्या माध्यमांसाठी तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सेंट्रल हॉल नसेल नव्या संसदेत खासदारांना चर्चा करण्यासाठी आणि भेटण्यासाठी जागा नसेल. सेंट्रल हॉलमध्ये सर्व पक्षांचे खासदार आपापसात चर्चा करत असत. माध्यमातील लोकही याच गप्पागोष्टीत सामील होत असत. हा सेंट्रल हॉल नेहमीच स्मरणात राहील.

टॅग्स :Parliamentसंसद