शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात जिंकल्या पण...! भाजपाला शतकासाठी हव्या होत्या पाच, पण आणखी तीन घटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 08:49 IST

महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरयाणात शानदार विजय मिळवूनही राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरयाणात शानदार विजय मिळवूनही राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले आहे. त्यामुळे १५ राज्यांतील ५७ जागांसाठीच्या निवडणुकीनंतर भाजप राज्यसभेत शंभराचा आकडा गाठू शकलेला नाही; तर, सभागृहात काँग्रेसची सदस्यसंख्या ३० आहे. 

गत सहा दशकांत राज्यसभेत कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपला हेही शक्य झाले नसते. मात्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मोठ्या प्रयत्नांनी तीन जागा जिंकून हा आकडा गाठता आला आहे. 

अर्थात, तीन जागा कमी झाल्या असल्या तरी पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. राजस्थानातील एक जागेच्या नुकसानीमुळे पक्षनेतृत्व नाराज आहे. नामनिर्देशित सात संसद सदस्यांनी पक्षात प्रवेश केला तरी भाजप १०० चा आकडा गाठू शकत नाही. २४५ सदस्यीय सभागृहात सात जागा रिक्त आहेत. 

आपने सातही जागा जिंकल्या-आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये मोठे यश मिळविले.  राज्यसभेच्या सर्व सात जागा जिंकल्या आणि दहाचा आकडा गाठला आहे. - तृणमूलच्या १३ जागांनंतर ‘आप’ हा १० जागा जिंकणारा तिसरा राष्ट्रीय पक्ष आहे. चौथा पक्ष द्रमुककडे १० जागा आहेत. 

अकाली शून्यावर, बसप अवघी एक राज्यसभेत अकाली दलाचा एकही सदस्य राहिलेला नाही. तर, बसपाचा एक सदस्य आहे. सपाची संख्या कमी होऊन तीन झाली आहे. शिवसेना ३, राष्ट्रवादीचे ४ सदस्य आहेत. आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस ९ सदस्यांसह पाचवा मोठा पक्ष आहे. 

माकन यांचा पराभव कुणामुळे?हरयाणाच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अजय माकन ०.६ मतांनी पराभूत झाले. बीजेपी-जेजेपी समर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी त्यांचा पराभव केला. अजय माकन यांच्या पराभवामुळे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित होत आहेत.

भाजपचा गड अभेद्य राहिला नाहीनिकाल पाहिल्यानंतर भाजपचा निवडणूक गड अभेद्य राहिला नसल्याचे समोर येते. भाजप समर्थित उमेदवार विजय मिळवू शकले नाहीत. विरोधकांतील एकजूट समोर येत असतानाच पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप