शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर करणार हिंदू धर्माचा स्वीकार, जनरल रावत यांच्या झालेल्या अपमानामुळे व्यथित होऊन घेतला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 11:27 IST

Bipin Rawat Helicopter Crash: प्रसिद्ध चित्रपट निर्माते Ali Akbar यांनी त्यांच्या पत्नीसह धर्मांतर करून Hindu धर्मामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आपण धर्मांतराचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

कोच्ची - प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नीसह धर्मांतर करून हिंदू धर्मामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आपण धर्मांतराचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. जनरल रावत यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर  काही लोकांनी कथितपणे स्मायलीच्या इमोजी टाकल्या होत्या. बुधवारी तामिळनाडूतील कुनूर जिल्ह्यामध्ये झालेल्या या अपघातामध्ये जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा मृत्यू झाला होता. (Ali Akbar to become Hindu)

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार अकबर यांनी सांगितले की, इस्लामच्या वरिष्ठ नेत्यांनीही या बहादूर सेनापतीचा अपमान करणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांचा विरोध केला नाही. त्यांनी सांगितले की, ही बाब स्वीकार करता येऊ शकत नाही. या सर्व प्रकारामुळे माझा या धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी बुधवारी यासंबंधीचा एक व्हिडीओ फेसबूकवरसुद्धा शेअर केला होता.

यामध्ये त्यांनी सांगितले की, आज मी जन्मापासून मिळालेल्या या ओळखीचा त्याग करत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही आहे. मी एक भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरोधात हजारो स्मायली इमोटिकॉन्स शेअर केले आहेत. अनेक मुस्लिम युझर्सनी त्यांच्या या पोस्टचा विरोध केला. तसेच त्यांच्यासाठी अपशब्दांचाही वापर केला. दरम्यान, अनेक युझर्सनी त्यांना पाठिंबाही दिला. मात्र काही वेळाने फेसबूकवरून ही पोस्ट गायब झाली होती.

अजून एका पोस्टमध्ये अकबर यांनी लिहिले की, सीडीएस रावत यांच्या मृत्यूनंतर हसणाऱ्या लोकांची देशाने ओळख केली पाहिजे. तसेच त्यांना शिक्षा दिली पाहिजे. सोशल मीडियावर अनेक देशविरोधी कृत्ये सुरू असतात. तसेच रावत यांच्या मृत्यूवरून हसणे याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी सांगितले की, बहुतांश लोक जे स्मायलिंग इमोटिकॉन्ससह कमेंट्स करत आहेत. तसेच रावत यांच्या मृत्यूवरून आनंद साजरा करत आहेत, ते विशिष्ट्य धर्माचे आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, रावत यांनी पाकिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात अनेकदा कठोर कारवाया केल्या, त्यामुळे त्यांनी असे केले असावे. असल्या पोस्ट पाहूनही कुठल्याही वरिष्ठ मुस्लीम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नाही. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतKeralaकेरळHinduहिंदू