शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जमावाच्या मारहाणीत कुटुंब झाले जखमी

By admin | Updated: July 15, 2017 00:23 IST

जुनैद या तरूणावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार ताजा असतानाच, उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळही तशीच घटना घडली आहे.

आग्रा : रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान जुनैद या तरूणावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार ताजा असतानाच, उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळही तशीच घटना घडली आहे. शिकोहाबाद-कासगंज पॅसेंजरमध्ये एका कुटुंबावर जमावाने बुधवारी संध्याकाळी हा हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अपंग व्यक्तीला जमावाने मारहाण केली. कपड्यांवरून ते हिंदू नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. कुटुंबातील सर्व जखमींना फारूखाबादच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भोगावजवळ आम्ही ट्रेनमध्ये चढलो. गाडी जेमतेम ४ किलोमीटर पोहाचली, तोच एका इसमाने माझा मुलगा फैजान याच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला. फैजानने मोबाइल देण्यास विरोध करताच जमावाने त्याला मारहाण सुरू केली. कुटुंबातील इतर मध्ये पडले, तेव्हा जमावाने आमच्यासोबतच्या महिलांना शिवीगाळ सुरू केली.या मारहाणीत कुटुंबातील ४ सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या डोक्याला आणि पोटालाही मार लागला आहे, असे ५० वर्षीय मोहम्मद शाकिर यांनी म्हणाले. जमावाला आमच्या दिशेने येताना पाहून आम्ही कंपार्टमेंटचा दरवाजा बंद करण्याता प्रयत्न केला, पण तोपर्यंत काही जण आत घुसले. बेशुद्ध होइपर्यंत त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचे कुटुंबातील एकाने सांगितले. (वृत्तसंस्था)>कपडेही फाटलेया कुटुंबातील महिलांच्या शरीरावरही मारहाणीच्या खुणा आहेत. त्यांचे कपडेही फाटले होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.