वडमुखवाडीत बनावट दारूचा कारखाना उध्वस्त
By admin | Updated: September 20, 2015 23:33 IST
पुणे : वडमुखवाडी येथे सुरु असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने रविवारी छापा टाकून २७ लाख ७९ हजार ४४० रुपयांचा माल जप्त केला आहे़ याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत़भोसरी आळंदी रोडवरील मॅगजीन कॉनरला बिरलो इंजिनिअरिंगजवळ हा ...
वडमुखवाडीत बनावट दारूचा कारखाना उध्वस्त
पुणे : वडमुखवाडी येथे सुरु असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने रविवारी छापा टाकून २७ लाख ७९ हजार ४४० रुपयांचा माल जप्त केला आहे़ याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत़भोसरी आळंदी रोडवरील मॅगजीन कॉनरला बिरलो इंजिनिअरिंगजवळ हा बनावट दारूचा कारखाना गेल्या काही दिवसांपासून सुरु होता़ याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला मिळाली़ मुंबईहून आलेल्या या पथकाने आज दुपारी तेथे छापा टाकून ही कारवाई केली आहे़ रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती़