शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

#Metoo आरोप निखालस खोटे, हा बदनामीचा ‘अजेंडा’ - एम. जे. अकबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 05:51 IST

- सुरेश भटेवरा  नवी दिल्ली : यौन शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष ...

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : यौन शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष हमखास बाधते. बेजबाबदार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे’, असा इशारा देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी या प्रकरणात अखेर आपले हात झटकले.

अकबर संपादक असताना आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचे तसेच यौन शोषणांचे गंभीर आरोप ‘मी ट’ू चळवळीत ११ महिला पत्रकारांनी केले. त्यानंतर नायजेरिया दौरा अर्धवट सोडून रविवारी सकाळीच अकबर परतले. विमानतळावर येताच शक्यतो मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र प्रश्नांचा भडिमार झाल्यावर ‘मी माझे निवेदन नंतर देईन’, इतके त्रोटक उत्तर देत ते निघून गेले. मात्र त्यानंतर त्यांनी निवेदन जारी केले. ते म्हणाले, या आरोपांबाबत माझे वकील दखल घेणार आहेत. लोकसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच आरोप का होताहेत? काही महिलांनी२० वर्षे आधी झालेल्या कथित अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. राजीनामा नाहीचमी टू चळवळीत महिलांनी केलेल्या आरोपांनंतर अकबर मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे म्हटले जात होते. काँग्रेस, माकपासह अनेकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पंतप्रधान मोदी अकबर यांचा दौºयावरून परतताच राजीनामा घेतील, असेही बोलले जात होते. मात्र अद्याप तसे घडले नाही.पंतप्रधान मोदींनी मौन सोडावे- काँग्रेसअकबर यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प आहेत. त्यांचे हे मौन अस्वीकार्य आहे. सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी मौन त्वरित सोडले पाहिजे, अशी मागणी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी केली. जे पंतप्रधान बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संकल्प जाहीर करतात, महिलांच्या प्रतिष्ठेविषयी वारंवार बोलतात, ते आज गप्प कसे? हा विषय केवळ सरकारच्या नैतिकतेशी संबंधित नाही तर पंतप्रधानांनी ज्यांना सन्मानाने उच्चपदांवर बसवले त्यांची प्रतिष्ठाही या आरोपांमुळे पणाला लागली आहे, असेही शर्मा म्हणाले.

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरRapeबलात्कार