शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फेक न्यूज : अलिबाबा, जॅक मा यांना समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:13 IST

२० जुलै रोजी या प्रकरणी गुरुग्राम जिल्हा न्यायालयात न्यायाधीश सुषमा शिवखंड यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने जॅक मा, अलिबाबा कंपनीसह १२ उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना समन्स बजावला.

नवी दिल्ली : भारताविषयी खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी चीनमधील केवळ प्रचारी मजकूर प्रसारित करणाऱ्या यूसी ब्राऊझर अ‍ॅपची कंपनी अलिबाबा व संस्थापक जॅक मा यांना गुरूग्राम न्यायालयाने दणका दिला आहे. युसी ब्राऊझरमधील माजी कर्मचाºयाच्या तक्रारीवरून जिल्हा न्यायालयाने कंपनीस समन्स बजावला आहे. येत्या २९ जुलै पर्यंत त्यांना न्यायालयात हजर व्हावे लागेल.२० जुलै रोजी या प्रकरणी गुरुग्राम जिल्हा न्यायालयात न्यायाधीश सुषमा शिवखंड यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने जॅक मा, अलिबाबा कंपनीसह १२ उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना समन्स बजावला. त्यांना महिनाभरात लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. अलिबाबा कंपनीने यावर कोणतेही स्पष्टीकरणे दिले नाही. परमार यांनी कंपनीला २ लाख ६८ हजार अमेरिकन डॉलर्सची नुकसान भरपाई मागितली आहे. त्यांची बाजू वकील अतुल अहलावत यांनी मांडली.चिनी कंपनी अलिबाबाच्या व्यवस्थापन मंडळावर नियमाप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाचा नेता सदस्य असतो. अप्रत्यक्षपणे पक्षाचा हस्तक्षेपही कंपनीच्या कामात होतो. युसीसह चिनी अ‍ॅपवर तिबेट, दलाई लामा, हाँगकाँग आंदोलन, हाँगकाँग राष्ट्रीय सुरक्षा कायदा, चीनमधील भ्रष्टाचार, भारत-चीन सीमावाद, लद्दाख, अक्साई चीन हे शब्द असलेला मजकूर प्रसारित केला जात नाही.मात्र भारतीय नेत्यांविषयी कथित आक्षेपार्ह बातम्या, गरीबी, भ्रष्टाचार, बलात्कार, कचरा, अस्वच्छता, जात, धर्म, जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्क चळवळ, नागा-बोडो लँड आंदोलनाशी संबधित मजकूर मात्र आवर्जून प्रसिद्ध केला जातो. वापरकर्त्यांना विशिष्ट माहितीपासून दूर ठेवले जाते. परमार यांनी कंपनीच्या याच धोरणावर आक्षेप घेतला होता.तक्रार काय आणि कोणाची?भारताविषयी खोट्या बातम्या प्रसारित करणे, चीनविषयी संवेदनशील माहिती दडवण्यावर आक्षेप घेतल्याने अन्यायकारक पद्धतीने सहयोगी संचालक पदावरून हटवल्याची तक्रार पुष्पेंद्र सिंह परमार यांनी केली. पदावरून दूर करताना परमार यांना कंपनीने कोणतेही कारण दिले नाही. राजीनामा देण्याची सक्ती केली. त्यामुळे परमार यांनी न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Courtन्यायालयAlibabaअलीबाबा