शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फेक न्यूज आदेशामुळे स्मृती इराणी तोंडघशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:47 IST

  खोट्या बातम्या देणाऱ्या वा तिचा प्रसार करणा-या पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी तोंडघशी पडल्या आहेत.

हरीश गुप्ता  नवी दिल्ली  -  खोट्या बातम्या देणाऱ्या वा तिचा प्रसार करणाºया पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी तोंडघशी पडल्या आहेत. इराणी यांच्या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्याने तो मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या.खोट्या बातम्यांची चौकशी करण्याचे अधिकार फक्त प्रेस कौन्सिल आॅफ इंडियालाच आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तीनदा खोट्या बातम्या देणाºया पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द केली जाईल, असे पत्रक इराणी यांच्या खात्याने सोमवारी जारी केले. पहिल्यांदा खोटी बातमी दिल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता सहा महिन्यांसाठी, दुसºयांदा खोटी बातमी दिल्यास एक वर्षासाठी व तिसºया खेपेस अधिस्वीकृती मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा हा आदेश होता.टीका होत असतानाही इराणी आज सकाळपर्यंत या निर्णयाचे जोरात समर्थन करीत होत्या. राजकीय पक्षांनी तसेच पत्रकारांच्या संघटनांनी निर्णयावर कठोर टीका करीत, आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर दुपारी इराणी यांनी यासंदर्भात पत्रकारांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. मात्र त्यानंतर १0 मिनिटांतच पंतप्रधान कार्यालयाने निर्णयच रद्द करण्याचा आदेश दिला. इराणी यांच्या निर्णयावर सर्वात आधी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया आणि नॅशनल ब्रॉडकास्टिंग असोसिएशन या संस्था बातमी बोगस आहे का, हे ठरवतील, असे इराणी म्हणाल्या होत्या.काँग्रेस व माकपची टीकाया निर्णयाचा वापर प्रामाणिक पत्रकारांना छळण्यासाठी होऊ शकतो, अशी टीका काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. सरकारला अप्रिय वाटणा-या बातम्या देऊ नयेत यासाठीच ही उपाययोजना केलेली नाही ना, असा सवाल काँग्रेसने केला आहे. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी आम्ही आणीबाणीत लढा दिला. बदनामीविरोधी कायद्याविरोधातही मैदानात उतरलो होतो, याचीही त्यांनी आठवण करून दिली.विहिंपही विरोधातया निर्णयाद्वारे केंद्र सरकार देशात अघोषित आणीबाणीच लागू करू पाहत असल्याची टीकाविश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनीही केली होती.

 

 

 

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीJournalistपत्रकारGovernmentसरकार