शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेड न्यूजपेक्षा फेक न्यूज अधिक धोकादायक - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:17 IST

पैसे देऊन प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपेक्षा (पेड न्यूज) खोट्या बातम्या (फेक न्यूज) अधिक धोकादायक असतात.

नवी दिल्ली : पैसे देऊन प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपेक्षा (पेड न्यूज) खोट्या बातम्या (फेक न्यूज) अधिक धोकादायक असतात. अशा अपप्रवृत्तींविरोधात केंद्र सरकार व प्रसार माध्यमांनी संयुक्त लढा देण्याची गरज आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले.ते म्हणाले की, मुलांना पळवून नेणाऱ्या लोकांविषयी गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियातून झळकलेल्या खोट्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवून देशात विविध ठिकाणी जमावाने केलेल्या मारहाणीत २० ते ३० लोकांचे बळी गेलेआहेत.प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असे कोणतेही पाऊल केंद्र सरकार उचलणार नाही. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, चित्रपटांना आहे तशी नियमावली इंटरनेटद्वारे प्रसारित होणाºया चित्रपट व अन्य कार्यक्रमांसाठीही (ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्म्स - ओटीटी) लागू करणे आवश्यक आहे.इंटरनेट किंवा आॅपरेटरच्या नेटवर्कद्वारे उपलब्ध होणाºया ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये न्यूज पोर्टल, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसारखे स्ट्रीमर यांचाही समावेश होतो.ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्याबद्दल मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिले होते.ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नियमावली हवीप्रकाश जावडेकर म्हणाले की, वृत्तपत्रांसंदर्भातील बाबींचा विचार करण्यासाठी प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया ही संघटना आहे. वृत्तवाहिन्यांवर न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन ही संघटना लक्ष ठेवून असते.जाहिरातींसाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल आॅफ इंडिया, तर चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहे. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म्स व न्यूज पोर्टलना प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही.ती यंत्रणा उभारण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Biharबिहार