शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:39 IST

आजवर फसवणुकीचे अनेक नवनवीन फंडे आपण पाहिले आहेत; परंतु गाझियाबादमध्ये एकाने चक्क बनावट दूतावास उघडून घोळ केल्याचे उघड झाले आहे.

नवी दिल्ली : आजवर फसवणुकीचे अनेक नवनवीन फंडे आपण पाहिले आहेत; परंतु गाझियाबादमध्ये एकाने चक्क बनावट दूतावास उघडून घोळ केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून ४४ लाख रुपये, राजनैतिक पासपोर्ट, ३४ शिक्के, वाहने, पासपोर्ट, घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. हर्षवर्धन जैन असे त्याचे नाव असून, त्याला गजाआड करण्यात आले. त्याच्याकडून ४४ लाख रोख व अनेक देशांचे परकीय चलन जप्त केले. त्याच्या ताब्यातून राजनैतिक नंबरप्लेट असलेली चार वाहनेही जप्त केली आहेत. यात १८ राजनैतिक नंबरप्लेट व लहान देशांच्या १२ राजनैतिक पासपोर्टांचा समावेश आहे.

बनला होता राजदूत भाड्याच्या घरात त्याने बनावट दूतावास उघडले होते. वेस्ट आर्क्टिका, साबोर्ग, पौलविया आणि लोडोनिया यांसारख्या देशांचे राजदूत असल्याचा बनावट दावा तो करीत होता. फोटो मॉर्फ केले...आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी त्याने वाहनांवर राजनैतिक नंबर प्लेट्स वापरल्या. राष्ट्रपती, पंतप्रधान व इतर मान्यवरांबरोबर  आपले संबंध आहेत, असे भासवण्यासाठी त्याने अनेक फोटो मॉर्फ केलेले आढळले. नेमका उद्योग कोणता? हा सर्व उपद्व्याप त्याने कंपन्या व व्यक्तींना परदेशात काम करण्याकरिता दलालीचे व्यवहार करण्यासाठी केले.  तो बनावट कंपन्यांद्वारे हवाला रॅकेटही चालवतो, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशghaziabad-pcगाझियाबाद