नवी दिल्ली : ‘अच्छे दिन सरकार’ शेतक-यांच्या मुद्यावर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी रालोआ सरकारला धारेवर धरले. बहुचर्चित सुटी संपवून लोकसभेत परतल्यानंतर प्रथमच भूसंपादन विधेयकावरून त्यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी समुदायाकडे दुर्लक्ष करीत उद्योगपती आणि श्रीमंत लोकांच्या कल्याणावर भर देणे ही भाजपाची घोडचूक ठरेल. शेतकरी बांधव भविष्यात भाजपाला धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. कृषी परिस्थितीवर अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, देशाने जे काही कमावले त्याचा पाया शेतकऱ्यांनीच घातला आहे, मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुटाबुटातले अपयशी सरकार
By admin | Updated: April 21, 2015 02:37 IST