शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Fact Check: RBI ने UPI पेमेंटसाठी Google Pay ला परवानगी दिली नाही? जाणून घ्या व्हायरल दाव्यांचे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:29 IST

Google Pay: भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI पेमेंटसाठी Google Pay ला मान्यता दिलेली नाही, असा मेसेज व्हायरल होत आहे.

Fact Check of Google Pay: आजच्या काळात सोशल मीडिया हे माहितीचे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. पण, कधी-कधी अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यांचे क्रॉस चेकिंग फार महत्त्वाचे असते. बदलत्या काळानुसार युनिफाइड पेमेंट सिस्टम वापरणे ही आजच्या काळात सर्वसामान्यांची गरज बनली आहे. अलीकडच्या काळात पेटीएम, फोनपे, गुगल पे इत्यादींचा वापर खूप वेगाने वाढला आहे. अशातच, Google Pay बद्दलची एक बातमी खूप वेगाने व्हायरल होत आहे.

काय व्हायरल होतंय?या बातमीत असा दावा केला जातोय की, भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI पेमेंटसाठी Google Pay ला अधिकृत मान्यता दिलेलीच नाही. अशा परिस्थितीत गुगल पे वापरणारे लोक ही व्हायरल पोस्ट पाहून खूप नाराज झाले आहेत. तुम्हीही ही व्हायरल पोस्ट पाहिली असेल, तर आम्ही तुम्हाला या बातमीचे सत्य सांगणार आहोत.

हा दावा केला जातोयसोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), जे भारतातील UPI पेमेंटशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे नियमन करते. याने UPI पेमेंटसाठी Google Pay ला अधिकृत केलेले नाही. एखाद्या यूजरला UPI पेमेंट करताना काही अडचण येत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तक्रारही दाखल करू शकत नाही. कारण ती NPCI आणि RBI द्वारे मान्यताप्राप्त पेमेंट सिस्टम नाही, असेही यात म्हटले आहे.PIBने तथ्य समोर आणलेप्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल दाव्याची सत्यता तपासली असून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की, आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे की Google Pay RBI ची मान्यता नाही. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. या दाव्यात अजिबात तथ्य नाही. Google Pay ही NPCI मान्यताप्राप्त पेमेंट सेवा प्रदाता आहे. यावर NPCI चे सर्व नियम लागू आहेत. यासोबतच, काही विसंगती आढळल्यास, तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

तुम्हीही तथ्य तपासणी करू शकतातुम्हाला कोणत्याही व्हायरल मेसेजची सत्यता तपासायची असेल, तर तुम्हाला पीआयबी त्या बातमीची सत्यता तपासण्याची सुविधा देते. यासाठी तुम्ही फेसबुक https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसेच, तुम्ही pibfactcheck@gmail.com वर ईमेल करून किंवा 8799711259 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करून माहितीची सत्यता तपासू शकता.

टॅग्स :google payगुगल पेReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक