शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या घोडचुकीमुळे कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली दहशतवाद्यांना

By admin | Updated: June 18, 2017 16:59 IST

सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनवधानानं फेसबुककडून ही माहिती दहशतवाद्यांना मिळाल्याचं वृत्त द गार्डियन या वृत्तपत्राने दिलं आहे. फेसबुकमधील तांत्रिक बिघाडानं जवळपास 22 विभागांतल्या 1 हजार कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांना मिळाल्याची बाब समोर आली आहे. 

फेसबुकच्या 1 हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. माहिती लीक झालेले कर्मचारी फेसबुकवर दहशतवाद्यांचा प्रचार, प्रसार आणि अश्लील पोस्ट रोखण्याचे काम करतात. सॉफ्टवेअरमधील बगमुळे या कर्मचाऱ्यांचीच माहिती दहशतवाद्यांना मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी संशयित दहशतवाद्यांना फेसबुकवर बॅन केले होते, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती बॅन करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मिळाली आहे. या सर्व प्रकरणानं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका कर्मचाऱ्याने राजीनामा देत घरी बसणे पसंत केले आहे. (आता फेसबुक रोखणार दहशतवाद)

फेसबुकने नोव्हेंबरमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिघाड कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली. वाढत्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी आणि त्यासंदर्भातील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकने विशेष सुविधा सुरू केली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, भावना भडकावणाऱ्या पोस्ट फेसबुककडून डिलीट केल्या जाणार आहेत. त्याबद्दलच्या तंत्रज्ञानादरम्यानच फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली. फेसबुकनेदेखील चूक झाल्याचे मान्य केले असून, असा प्रकार टाळण्यासाठी तांत्रिक बदल करू, असे म्हटले आहे.