शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिव दु:ख... कॅप्टन अरमिंदर सिंगांच्या पत्रात प्रियंका अन् राहुल गांधींवरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 19:43 IST

कॅप्टन सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

ठळक मुद्देसिद्धूंना लगाम घालण्याऐवजी प्रियंका आणि राहुल यांनी त्यांना संरक्षण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यपदांचीही संधी दिली. तर आपणही त्याकडे डोळेझाकपणेच पाहिले, असे म्हणत अरमंदिर सिंग यांनी राहुल अन् प्रियंका यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई - माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडणार असून भारतीय जनता पक्षात जाणार नसल्याचं माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं होतं. तसेच, सिंग यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढणार असल्याचंही सांगितलं. आता, कॅप्टन सिंग यांनी आपल्या नवीन राजकीय पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपला पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पत्रात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. 

कॅप्टन सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, 'पंजाब लोक काँग्रेस' नावाने नवीन पक्षाची घोषणाही केली. तसेच, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर जोरदार प्रहार केला.   सिद्धूंना लगाम घालण्याऐवजी प्रियंका आणि राहुल यांनी त्यांना संरक्षण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यपदांचीही संधी दिली. तर आपणही त्याकडे डोळेझाकपणेच पाहिले, असे म्हणत अरमंदिर सिंग यांनी राहुल अन् प्रियंका यांच्यावर निशाणा साधला. तर, काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस हरीश रावत यांनीही सिद्धूंच्या वर्तणुकीला प्रोत्साहन दिले. कदाचित, त्यामुळेच मला ते सर्वाधिक संशयित व्यक्ती वाटतात, असेही कॅप्टनने म्हटले आहे. पक्षाकडून माझ्यासोबत झालेल्या व्यवहारामुळे मला अतिव दु:ख झाल्याचेही सिंग यांनी आपल्या 7 पानी पत्रात म्हटले आहे.    

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पक्षाला पंजाब लोक काँग्रेस असं नाव दिलं आहे. आपण पंजाबमधील सर्व ११७ जागा लढवू असंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय भाजपसोबत युती केली जाईल का नाही यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. "मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं. आम्ही सीट शेअर करू शकतो. याबाबत भाजपशी चर्चा झाली नसली तरी यावर विचार करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

पंजाबमधील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लवकरच एका राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे कॅप्टन सिंग यांनी सांगितले होते. जर शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात निर्णयात येईल, तर पुढील 2022 ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत आघाडीची आशा आहे, असेही सिंग यांनी म्हटले होते. 

डोवाल यांचीही घेतली होती भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सुरक्षेबद्दल काही विषयांवर चर्चा झाली. त्यात संवेदनशील मुद्द्यांचा समावेश असल्यानं त्यावर भाष्य करू शकत नाही, असं सिंग यांनी सांगितलं. सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यांनी राज्यातल्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असं सिंग म्हणाले. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही पंजाब काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष होते. मात्र सिद्धूंनी जे केलं, ते आधी कोणीही केलेलं नाही, असं सिंग यांनी म्हटलं.  

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी