शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘सेक्सटॉर्शन’द्वारे लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा; देशभरात २८ हजार प्रकरणे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:22 IST

हरयाणा राज्यातील नूह जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारांनी देशभरातील लोकांना १०० कोटी रुपयांना गंडा घातला आहे.

नूह : हरयाणा राज्यातील नूह जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारांनी देशभरातील लोकांना १०० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. ही धक्कादायक माहिती हरयाणा पोलिसांनी नूहमध्ये टाकलेल्या धाडींतून उघड झाली. तेथील ठकसेनांनी दिल्ली, उत्तर प्रदेशपासून अंदमान निकोबारपर्यंतच्या रहिवाशांना फसविले आहे. त्यांच्याकडून लुबाडलेले पैसे बनावट बँक खात्यांत जमा करण्यात येत असत. नूहच्या सायबर गुन्हेगारांची देशभरातील २८ हजार प्रकरणे आता उजेडात आली आहेत.

सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आकर्षक प्रोफाईल तयार करून सेक्सटोर्शनद्वारे पीडितांची फसवणूक करत असत. पीडितांना व्हिडिओ चॅटवर येण्याचे आमिष दाखवत, जिथे ते पीडितांना आक्षेपार्ह स्थितीत स्क्रीन रेकॉर्ड करायचे आणि नंतर त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायचे, असे पोलिसांनी सांगितले.

फसवणूक पद्धती...

फेसबुक बाजार, ओएलएक्स आदी ठिकाणी बाइक, कार, मोबाइल फोनसारख्या उत्पादनांवर आकर्षक ऑफर असल्याचे भासविण्यात येत. ‘उत्पादनाचे घरातून काम करा, दर महिना ३० हजार रुपये कमवा’ अशा जाहिरातीदेखील या गुन्हेगारांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्या जात. त्यातूनही ते लोकांकडून पैसे उकळत होते.