शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:38 IST

मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे परराष्ट मंत्र्यांकडून संकेत

नवी दिल्ली: लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल, असं महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच हिस्सा आहे आणि लवकरच तो भौगोलिकदृष्ट्या भारतात असेल, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे संकेत दिले. मोदी सरकार-२ ला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरसह कलम ३७० सह आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या भूमिकेवरदेखील भाष्य केलं.  जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल विधानं केली आहेत. कलम ३७० नंतर आता पीओके सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं. यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील सिंह यांचीच री ओढली. कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा कलम ३७०शी काहीही संबंध नाही. पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे, असं जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं.  काश्मीर आणि कलम ३७० चा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेणाऱ्या पाकिस्तानलादेखील जयशंकर यांनी टोला लगावला. कलम ३७० हा पूर्णपणे अंतर्गत मुद्दा आहे. आंततराष्ट्रीय समुदायाला या विषयाची कल्पना आहे, असं जयशंकर म्हणाले. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र इतर देशांनी पाठिंबा न दिल्यानं पाकिस्तान तोंडावर आपटला होता. जयशंकर यांनी सार्कबद्दल बोलतानाही पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. सार्क दक्षिण आशियातील देशांची संघटना आहे. तिचा संबंध व्यापार, दळणवळणाशी आहे. या गोष्टींमधील सहकार्यासाठी दहशतवादाची आवश्यकता नाही. कोणता देश सार्कला पुढे नेतोय आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, याचा विचार सार्क देशांनी करावा, असं जयशंकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ